अकोला : माजी राज्यमंत्री लोकप्रिय आमदार गोवर्धन शर्मा तथा ‘लालाजी’ यांचे शुक्रवारी निधन झाले़ आज शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकाेला येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत लालाजींच्या पार्थीवाचे दर्शन घेत श्रध्दाजंली अर्पण केली. यावेळी त्यांनी जनसामान्याचे नेता हरपला अशी शाेकसंवेदना व्यक्त केली.
लालाजी साेबत २५ वर्ष विधीमंडळात काम केले़ ते अत्यंत प्रतिभावंत नेतृत्व हाेते. सर्व सामान्यासह प्रत्येक कार्यकर्त्यासाेबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबध हाेते़ अकाेल्यात आलाे म्हणजे लालाजी असे समिकरण हाेते पंरतु आता लालाजी आपल्यात राहिले नाहीत. त्यांना श्रघ्दाजंली देताना मन गहिवरून येते अशी भावना उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शासनाच्यावतीने श्रध्दाजंली अर्पण केली.
तत्पूर्वी लालाजींच्या पार्थीवाला पाेलिस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात आली़ यावेळी आमदार आशिष जयस्वाल, आमदार रणधीर सावरकर,आमदार वसंत खंडेलवाल, आमदार आकाश फुंडकर,शिवसेनेचे (उबाठा)आमदार नितीन देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी,माजीमंत्री रणजित पाटील, शिवसेनेचे (शिंदे गट) संपर्क नेते आमदार गाेपीकीशन बाजाेरीया, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार दाळू गुरूजी, विजय अग्रवाल, किशाेर मांगटे पाटील, जयंत मसने, बसंत बाछुका, विजय मालाेकार,मदनलाल खंडेलवाल,अनुप धाेत्रे, गिरीश जाेशी, विजय इंगळे, स्वानंद काेडाेंनीकर, मदन भरगड, संदीप जाेशी, राजेश मिश्रा, प्रा. प्रकाश डवले, विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, महानगर संघ चालक गाेपाल खंडेलवाल, शिवसेना जिल्हा प्रमुख (शिंदे गट) विठ्ठल सरप, काॅंग्रेसचे महानगराध्यक्ष डाॅ.प्रशांत वानखडे,रामनवमी शाेभायात्रा समितीचे अध्यक्ष रामप्रकाश मिश्रा, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पाेलिस अधिक्षक संदीप घुगे आदींसह बहुसख्येने अकाेलेकरांची उपस्थिती हाेती.