मूर्तिजापूर : महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात ३ अपत्ये असल्याबाबत खोटी माहिती दिल्याने त्यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप करीत ना. धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, ना. धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत महिला पोलिसांत तक्रार दाखल करायला गेली असता, तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. त्यामुळे त्या महिलेला पोलीस आयुक्तांकडे तक्रार करावी लागली. या विषयावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले नसून, अशा मंत्र्यांना पाठीशी घातल्याचा आरोप केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी निवेदनातून भाजपातर्फे करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे, महिला आघाडी शहराध्यक्ष ज्योती केदार शर्मा, महिला आघाडी तालुकाध्यक्ष शारदा नीलेश मानके, धनश्री भेलोंडे, राधाताई तिवारी, अंजली भेलोंडे, अहिल्याताई माहील,
भूषण हिंमतराव कोकाटे, रितेश सबाजकर, राजू कांबे, हर्षल साबळे, राजेंद्र इंगोले, अविनाश यावले, बबलू भेलोंडे, विशाल सिंहे, नितीन भटकर, नीलेश वानखडे, ऋषिकेश वारे, विशाल गुप्ता, योगेश फुरसुले, सुमित सोनोने यांची उपस्थिती होती. (फोटो)