पाेलीस ठाण्यासमाेर वाहनांची गर्दी
अकाेला : आकाेट फैल व सिटी काेतवाली पाेलीस स्टेशनला स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने या दाेन पाेलीस ठाण्यांसमाेर वाहनांची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे़ यावर ताेडगा म्हणून आजूबाजूला वाहन तळात वाहने लावण्याची विनंती पाेलीस करीत आहेत. मात्र, नागरिक ऐकत नसल्याचेही वास्तव आहे.
दारूसाठा जप्त
अकाेला : आकाेट फैल परिसरात देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करून विक्री करणाऱ्यास दहशतवादविराेधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. शहरात अशा प्रकारे दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाइचा सपाटा सुरू आहे.
सिमेंट रस्त्यावर खड्डे
अकाेला : नव्यानेच बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. पाेस्ट ऑफिस चाैक ते सिव्हिल लाइन्स चाैकापर्यंतच्या राेडवर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, तर टाॅवर चाैक ते रतनलाल प्लाॅट चाैक राेडवरही खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
माेकाट कुत्र्यांचा हैदाेस
अकाेला : शहरात मांस विक्री सुुरू असलेल्या काही ठिकाणांवर कुत्र्यांचा माेठ्या प्रमाणात सुळसुळाट असून, याचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रात्रीच्या वेळी वाहन चालकांच्या मागे हे कुत्रे धावत असल्याने अपघाताच्या घटनाही घडल्या असून, काही जण जखमी झाले आहेत.