लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यासाठी झारखंडमध्ये प्रचार करण्याचा मान खासदार संजय धोत्रे यांना देऊन भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाने त्यांच्या संघटन कौशल्याचा गौरव केला आहे.भाजपाप्रणीत ३३ पक्षांचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व अखिल भारतीय कोळी महासंघाचे माजी अध्यक्ष केंद्रीय माजी सनदी अधिकारी रामनाथ कोविंद यांनी झारखंडमध्ये लोकप्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री अनंतकुमार, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, संसदीय कामकाज समितीचे सदस्य खा. संजयभाऊ धोत्रे व भोपाळचे खा. अलोककुमार संजर यांनी झारखंड राज्यातील खासदार, आमदार यांची भेट घेऊन राष्ट्रपती पदासाठी मतांचा जोगवा मागितला. यावेळी मंचावर रामनाथ कोविंद, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, केंद्रीय मंत्री अनंत कुमार, राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय भाजपा, राम नेताम, लक्ष्मण गिलवा, सुदेश महतो यांनी आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन केले, तसेच भाजपा प्रदेश प्रवक्ता दीपक प्रकाश त्यांच्या समवेत होते. खा. धोत्रे यांनी राष्ट्रपती पदाचे उमेदवार श्री रामनाथ कोविंद यांच्या कर्तुत्वाची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच संसदीय निवडणूक बोर्डाची निवड योग्य असल्याचे लोकप्रतिनिधींना पटवून दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यानंतर महाराष्ट्रातील खा. संजयभाऊ धोत्रे यांना राष्ट्रपती उमेदवारासोबत पक्षाने पाठविले आहे.
धोत्रे यांना राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी!
By admin | Published: July 14, 2017 1:25 AM