रिलायन्स फाऊंडेशनतर्फे कृषी विद्यापीठे तसेच कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीचा शेतकरी, पशुपालक तसेच महिला यांना कसा फायदा झाला, या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांनी अनुभव कथन केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पंदेकृविचे विस्तार शिक्षण संचालक डाॅ. दिलीप मानकर, वनामकृवि परभणी विस्तार शिक्षण संचालक डाॅ. डी.बी. देवसरकर, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, पीक संरक्षण विषय तज्ञ पद्मकर कुंदे, गृहविज्ञान विषय तज्ञ शुभांगी वाटाणे उपस्थित होत्या. प्रास्ताविक राज्य समन्वयक दीपक केकाण यांनी केले. कार्यक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या डिजिटल माध्यमातून मार्गदर्शनाचा कसा फायदा झाला, याबाबत आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाऊंडेशनचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे व कार्यक्रम सहायक सुमित मातीकाळे यांनी केले. तसेच तांत्रिक सहकार्य बुलडाणा जिल्हा व्यवस्थापक शुभम लाखकर यांनी केले.
जागतिक दूरसंचार दिनी शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांचा संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:19 AM