शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

तेल्हारा तालुक्यात डिजिटल शाळा मोहीम थंडावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:40 PM

सुरुवातीला वेगाने डिजिटल होणार्‍या  शाळांचे प्रमाण गेल्या चार ते पाच महिन्यात बोटावर मोजण्याइतपत आले आहे.  तेल्हारा तालुक्यातील १५७ शाळांपैकी केवळ ४२ शाळाच डिजिटल झाल्या असून, त्याही मोहीम सुरू झाल्यानंतरच झाल्या होत्या. 

ठळक मुद्देशिक्षकांच्या उदासीनतेमुळे विद्यार्थी तंत्रज्ञानापासून वंचित!तालुक्यातील १५७ शाळांपैकी केवळ ४२ शाळाच झाल्या डिजिटल 

सदानंद खारोडेलोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : शिक्षण विभागाने गेल्यावर्षी थाटात सुरू केलेली डिजिटल शाळेची मोहीम  तेल्हारा तालुक्यात थंडावल्याचे चित्र आहे. सुरुवातीला वेगाने डिजिटल होणार्‍या  शाळांचे प्रमाण गेल्या चार ते पाच महिन्यात बोटावर मोजण्याइतपत आले आहे.  तालुक्यातील १५७ शाळांपैकी केवळ ४२ शाळाच डिजिटल झाल्या असून, त्याही  मोहीम सुरू झाल्यानंतरच झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना आधुनिक साहित्याचा वापर करून शिकविल्यास त्यांची उत्सुकता  वाढेल, वर्गातील उपस्थिती वाढण्यात मदत होईल व विद्यार्थ्यांचे लक्ष जास्त वेळ  केंद्रित राहील, या उद्देशाने राज्यातील सर्व शाळांमध्ये डिजिटलसयंत्र बसविण्याचे  निर्देश राज्य शासनाने दिले होते; मात्र अपवाद वगळता राज्य शासनाने निधीसाठी  कोणतीही तरतूद केली नाही. लोकवर्गणीच्या माध्यमातून पैसे गोळा करून  शाळांमध्ये डिजिटल सयंत्र खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. २0१७ पर्यंत सर्वच  शाळा डिजिटल करण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे शिक्षक अध्यापन  करायचे सोडून लोकवर्गणीसाठी जोड देऊन शाळा डिजिटल केल्या व निम्या  शाळांनी मात्र शासनाच्या निर्देशाकडे साफ दुर्लक्ष केले. तालुक्यात जिल्हा परिषद व खासगी १५७ शाळा असून, केवळ ४२ शाळाच  डिजिटल झाल्या. मे २0१७ पासून म्हणजे गेल्या सहा तालुक्यातील ९0 टक्के  शिक्षकांना १0 वर्षे झाल्याने मे २0१७ पासून राज्यस्तरीय बदली प्रक्रिया सुरू  असल्याने सर्व शिक्षकांचे लक्ष ऑनलाइन बदलीकडे लागल्याचे दिसत आहे.  त्यामुळे त्यांचे डिजिटल शाळेकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढणे त्यांना कठीण झाले.   यावर्षीच्या सत्रात मात्र शिक्षण विभागाने डिजिटल शाळांचा आढावा घेणे जवळपास  बंद केले, त्यामुळे शिक्षकांनीही डिजिटल साधने खरेदी करण्याकडे दुर्लक्ष केले  आहे. परिणामी, मार्च २0१७ पर्यंत जेवढय़ा शाळा डिजिटल झाल्या, त्यामध्ये  अगदी मोजक्या शाळेची भर पडली आहे. 

बहुतांश शाळांमधील डिजिटल साधने धूळ खात!शासनाच्या दबावानंतर काही शिक्षकांनी लोकवर्गणी करून वेळप्रसंगी स्वत:च्या  खिशातले पैसे खर्च करून डिजिटल साधने खरेदी केली. या साधनाच्या साह्याने  काही काळ अध्यापन केले. यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात मात्र डिजिटल साधनांचा  वापर अध्यापन करताना अत्यंत कमी प्रमाणात केल्या जात आहे. त्यामुळे खरेदी  केलेले साहित्य धूळ खात आहे. 

शिक्षण विभागाचे नवीन उपक्रम थांबले प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागाच्यावतीने दर महिन्याला  नवनवीन उपक्रम शोधून काढले जात होते. सदर उपक्रम इच्छा नसतानाही  शिक्षकांच्या माथी मारले जात होते. याला शिक्षक संघटनेने विरोध केल्याने कोणतेही  उपक्रम राबविणे सध्या तरी बंद आहे. 

तेल्हारा तालुक्यातील सर्व शाळा या सत्रात डिजिटल व प्रगत करण्याचा निश्‍चय  शिक्षण विभागाने घेतला आहे. - विलास धमाडे, शिक्षणाधिकारी, पं.स. तेल्हारा.  

टॅग्स :Telharaतेल्हाराSchoolशाळा