- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील नागरिकांना अद्ययावत माहितीसह ‘आॅनलाइन’ सात-बारा देण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत ११ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार ९२१ सात-बारावर ‘डिजिटल’ स्वाक्षरी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्यावतीने डिजिटल स्वाक्षरी करण्यात आलेले सात-बारा डाउनलोड करण्यासाठी नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सात-बाराचा विविध शासकीय कामांसाठी वापर करता येणार आहे. सात-बारा आॅनलाइन उपलब्ध होत असल्याने, त्यासाठी नागरिकांना तलाठ्यांकडे जाण्याची गरज राहिली नाही. त्यानुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना अद्ययावत माहितीसह आॅनलाइन सात-बारा देण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत अद्ययावत माहितीसह सात-बारावर डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जिल्ह्यात एकूण ३ लाख ५९ हजार ८७४ सात-बारा असून, त्यापैकी ११ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार ९२१ सात-बारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना विविध कामांसाठी लागणारा अद्ययावत माहितीसह डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा आॅनलाइन उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना अद्ययावत माहितीसह आॅनलाइन सात-बारा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत ३ लाख ५७ हजार ९२१ सात-बारावर डिजिटल स्वाक्षरीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुुळे नागरिकांना अद्ययावत माहिती असलेला आॅनलाइन सात-बारा उपलब्ध होणार आहे.-जितेंद्र पापळकर,जिल्हाधिकारी.