नोडल अधिकारी राजेश भुगुल यांनी नगरपालिका क्षेत्रातील एकूण ३५७ दिव्यांगांनी नोंद केली असल्याचे व त्यांना हयात प्रमाणपत्र व दिव्यांग ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १० जानेवारी २०२१ पर्यंत वेळ दिली होती. त्यानुसार एकूण २३९ पात्र लाभार्थिंनी कागदपत्रे सादर केले असून त्यांच्या बँक खात्यात ५ लाख ४२ हजार ६०० रुपये निधी जमा करण्यासाठी बँकेला सादर करण्यात आला आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत निधी लाभार्थिंच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती दिव्यांग कक्षकडून देण्यात आली. तसेच उर्वरित लाभार्थिंनी कागदपत्रे सादर केल्यास त्वरित लाभ देण्यात येईल, असे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी सांगितले.
दिव्यांग सहायता निधी लाभार्थिंच्या बँक खात्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:17 AM