अकोला : ग्रामीण भागात कोविड चाचणीची योग्य सोय नाही. काही ठिकाणी चाचणीची सुविधा असली, तरी त्याचे अहवाल उशिरा मिळत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक कोविड चाचणीसाठी अकोल्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
डिस्चार्जनंतरही रुग्णांची गैरसोय
अकोला : सर्वोपचार रुग्णालयातून कोविड रुग्णाला डिस्चार्ज केल्यानंतर त्याला इतरांच्या संपर्कात न येता घरी जाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना स्वतंत्र किंवा खासगी वाहनाने जाणे शक्य नसल्याने ते सार्वजनिक विशेषत: एसटी बसचाच वापर करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोविड संसर्गाचा अधिक धोका आहे.
नॉनकोविड रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने डॉक्टरांवरील ताण वाढला आहे. त्याचा परिणाम नॉनकोविड रुग्णसेवेवर दिसून येत आहे. गत काही दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयातील नॉनकोविड रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.