चंद्रकात पाटील हे विदर्भ दाैऱ्यावर आहेत, ते अमरावती येथून शुक्रवारी अकाेल्यात आले हाेते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बाेलताना युतीबाबत आज तरी ठाम नकार असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. आता कार्यकर्त्यांना द्विधा मन:स्थितीत किंवा संभ्रमित ठेवायचे नाही. ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या साेबतची मतभेदाची दरी रुंदावली आहे. आज तरी युती होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे लगेचच २०१४ च्या स्वबळावरील निवडणुकीचा संदर्भ देत युतीसाठीचे दरवाजे खुले असल्याचेही संकेत दिले. यावेळी माजी मंत्री डाॅ. संजय कुटे, जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.
राजू शेट्टी लक्ष्मीपती; पण...
राजू शेट्टींच्या महाविकास आघाडीशी सध्या बिघडत असलेल्या संबंधांवर चंद्रकांत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली. शेट्टी परत महायुतीत येतात का याबाबत त्यांनी वक्तव्य टाळले.
ते म्हणाले की, माझे शेट्टींसाेबत चांगले संबंध आहेत, त्यांना मी लक्ष्मीपती म्हणताे; पण ते दररोज मोदींना शिव्या द्यायचे. मोदी आमचे मायबाप, त्यांच्या विराेधात एक शब्दही आम्ही ऐकणार नाही, त्यामुळे ते कसं सहन करणार?, असा सवाल त्यांनी केला.