अकोला : नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तीत जिवीत हानी टाळण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत मंगळवार, १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा घेण्यात आली.एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) पथकातील अधिकारी व जवानांनी उपस्थिताना यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसिलदार राजेश्वर हांडे, मुख्य अग्नीशमन अधिकारी ठाकरे, एनडीआरएफ टीम कंमाडर जे. मुरमू, मनिषकुमार, श्री. मोरे, बी.एन. नवले व जवान उपस्थित होते. प्रास्ताविक व उदघाटनपर भाषण देशपांडे यांनी केले.यावेळी जे. मुरमू यांनी एनडीआरएफ बद्दल माहिती दिली. केंद्र सरकारने विशेष नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती हातळण्यासाठी हे पथक तयार केलं आहे. एनडीआरएफ हे पूर, भूकंप, त्सुनामी, वादळ यासारख्या नैसर्गिक संकटांसोबतच, न्यूक्लिअर रेडिएशन, केमिकल लिकेज, इमारत कोसळणे किंवा ढिगाºयाखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे, यांसारख्या संकटांचा कौशल्याने सामना करते. अशा संकटात सापडलेल्या लोकांना मदत करते. कोणत्याही आपत्तीचा कौशल्याने सामना करण्यासाठीच एनडीआरएफच्या जवानांना प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये जवानांना पूर, भूंकप, वादळ, त्सुनामी आदी आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांना कशी मदत करायची, वैद्यकीय सुविधा, हवाई प्रशिक्षण, डॉग स्कॉड हाताळणे, शोध आणि बचावकार्य आदींचं प्रशिक्षण दिलं जातं. देशात एनडीआरएफची पथके १० ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी एनडीआरएफचे पथक आहे.एनडीआरएफ पथकाचे जवान श्री. कृष्णा यांनी प्रात्यक्षिकासह विविध आपत्तीतून कसा बचाव करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भूकंप, उंच इमारती पासून बचाव, चक्रीवादळ, पूर, आग, अपघात यासह मानव निर्मित आपत्तीत प्रसंगावधान राखून आपत्तीत सापडलेल्या लोकांचा कशाप्रकारे बचाव करावा तसेच घटनास्थळी उपलब्ध साहित्याच्या मदतीने कशाप्रकारे प्रथमोपचार करावा, याबाबतची माहिती त्यांनी दिली.सूत्रसंचालन नायब तहसिलदार राजेंद्र इंगळे यांनी केले. तर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी आभार मानले. यावेळी तलाठी, होमगार्ड, ग्रामसेवक, अग्नीशमन दलाचे कर्मचारी, आरोग्य, पाणी पुरवठा, कृषी विभागाचे कर्मचारी, गायगाव येथील आॅयल डेपोचे कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, एनएसएस व एनसीसीचे विदयार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘एनडीआरएफ’च्या पथकाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 5:10 PM
अकोला : नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तीत जिवीत हानी टाळण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत मंगळवार, १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा घेण्यात आली.
ठळक मुद्दे१३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा घेण्यात आली.एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) पथकातील अधिकारी व जवानांनी उपस्थिताना यावेळी मार्गदर्शन केले. आॅयल डेपोचे कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, एनएसएस व एनसीसीचे विदयार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.