.........
शाहू महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान
अकोला - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे-पाटील यांचे शनिवारी व्याख्यान होणार आहे. ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण’ या विषयावर या व्याख्यानाचे आयोजन असून निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.
................
लसीकरण व चाचण्यांना प्राधान्य द्या
अकोला राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक प्रक्रिया राबवताना कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच निवडणुकीशी संबंधित सर्व कर्मचारी, अधिकारी उमेदवार यांचे आवश्यकतेनुसार लसीकरण, चाचण्या करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
......................
निवडणूक प्रक्रियेबाबत बैठक
अकाेला : जि.प.,पं. स. पोट निवडणुकीच्या अनुषंगाने गुरूवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त सर्व सूचनांचे वाचन केले व सर्वांना अवगत केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कोविडची खबरदारी निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर घेणे व त्याची माहिती ,त्या त्या वेळी सर्व संबंधितांना देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
..............................
कोविडच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू वाढले
अकोला : कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या अन् मृत्यूचा आलेख वाढताच असून, प्रत्येक महिन्यात नवा उच्चांक निर्माण होत आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिना सर्वाधिक घातक ठरला. मे महिन्यात तब्बल १५ हजार ३६१ रुग्ण, तर ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला.
..............................
हातगाड्यांवर गर्दी मावेना
अकोला : रिंगरोड तुकाराम चौक परिसरात सकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. वाहने रस्त्यावर उभी करून विक्रेते भोवती नागरिक गराडा घालताना दिसत आहेत. यावेळी कोणतेही सुरक्षित अंतर राखले जात नाही. परिणामी, कोविड संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.? गोरक्षण रोडवरही ठिकठिकाणी भाजीपाला आणि फळे विक्रेते भोवती असे चित्र दिसत आहे.?
दहा रुपयांच्या नाण्यांना ‘ना’ !
अकोला : दहा रुपयांचे नाणे चलनात असले तरी अनेक व्यावसायिक आणि ग्राहकांकडून बाजारात दहा रुपयांची नाणी नाकारली जात आहे. दहा रुपयांचे नाणे चालत नाही, असे सांगून अनेक व्यावसायिक ही हात वर करताना दिसत आहे.
.................
जलजन्य आजारापासून सावधान
अकोला : कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यातील जलजन्य आजार हाेऊ नये म्हणून नागरिकांनी काढा खरेदीवर भर दिला आहे. बाजारात विविध नामांकित कंपन्यांचे आयुर्वेदिक काढे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
..........
जिल्हा आरोग्य सेवेत रुग्णवाहिका दाखल
अकोला : जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्याचा एक भाग म्हणून आरोग्य सेवेत चार नवीन रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी आणखी रुग्णवाहिका लवकरच दाखल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
.......................