अकोला : पावसाळ्यात पूर परिस्थिती अथवा वादळामुळे ओढविणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना मोटर बोटी, रस्सी, रिंग, जॅकेट, बॅटरी, भोंगे, माइक यासह अन्य साहित्य पुरविण्यात आले. दरम्यान, पावसाळ्यास सुरुवात झाल्यानंतर गुरूवारी तहसील कार्यालयांमध्ये साहित्य ठेवून असलेल्या कक्षांना भेटी दिल्या असता, सर्व साहित्य धूळ खात असल्याचे तथा उंदराने कुरतडल्याने मोटर बोटी ‘पंक्चर’ झाल्याचे विदारक चित्र अकोट, मूर्तिजापूर आणि बाळापुरात आढळले. बार्शीटाकळीत मात्र कक्ष सुसज्ज असल्याचा आढळला.नाव ठेवली कचऱ्यात!आपत्कालीन या पथकात एका नौकेचा (मानव चलित बोट) समावेश असून, तीसुद्धा अडगळीत पडलेल्या अवस्थेत वर्षानुवर्षे ऊन, पावसात तशीच पडून असल्याने त्या नावेचे अनेक भाग कुजले आहेत.ऐनवेळी ती कामात पडते की नाही, याची खातरजमाही प्रशासन करीत नसल्याचे समजते. खरे तर या नावेची सुरक्षा घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे; परंतु सुरक्षेच्या नावाने अक्षता लावल्या जातात. नाव सुरक्षित व तिच्या देखभालीसाठी एका टिनशेडची आवश्यकता आहे व तिची नियमित साफसफाई होणे गरजेचे आहे; पण तसे न होता सदरची नाव धान्य गोदामाच्या बाजूला कचºयात पडली आहे. नावेमध्ये कचºयासह पावसाचे पाणी साचले असल्याने ती किती सुरक्षित आहे, याचा अंदाज येतो.शासकीय आपत्ती निवारण पथकाचे अस्तित्व साशंकतहसीलस्तरीय शासकीय नैसर्गिक आपत्ती निवारण पथक असल्याचे बोलल्या जाते; परंतु खरोखर हे पथक अस्तित्वात आहे की नाही, अशी शंका निर्माण होणे सहाजिकच आहे. जेव्हा जेव्हा या तालुक्यात अशी स्थिती निर्माण झाली, तेव्हा तेव्हा बाहेरच्या आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. गतवर्षी पुराचा तडाखा बसल्याने दोघांना आपला जीव गमवावा लागला होता.त्यांचे मृत शरीर शोधण्यासाठी व इतरही आपत्ती निवारण करण्यासाठी वेळोवेळी गाडगेबाबा आपत्कालीन पथक पिंजर व स्थानिक आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय आपत्कालीन पथक अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न सहाजिकच उभा राहतो.
आपत्ती निवारण साहित्य अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 2:22 PM