अकोला: जिल्हाभरातील प्रत्येक पाेलिस स्टेशनमध्ये गुन्हे शाेध पथकांचे (डीबी स्काॅड)गठन करण्यात आले आहे. या पथकातील चाणाक्ष पाेलिस कर्मचारी हे त्या-त्या पाेलिस स्टेशनचे डाेळे,कान समजल्या जातात. संभाव्य घटना व गुन्हा राेखण्यासाठी या पथकातील कर्मचाऱ्यांचे ‘नेटवर्क’तगडे असने अपेक्षित असताना ही पथके सुस्तावल्याचे चित्र आहे. यातूनच सिव्हील लाइन व खदान पाेलिस ठाण्यातील ‘डीबी स्काॅड’ जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी बरखास्त केल्याची माहिती आहे.
अवैध धंद्यांना पायबंद घालून चाेरी व लुटमारीच्या घटनांना उजेडात आणन्यासाठी प्रत्येक पाेलिस स्टेशनमध्ये गुन्हे शाेध पथक (डीबी स्काॅड)गठीत केले आहे. या पथकात चाणाक्ष, चाैकस व कर्तव्याप्रती इमानदार असलेल्या पाेलिस अंमलदारांचा समावेश करण्यात आला. परंतु मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील गुन्हे शाेध पथकातील कर्मचारी कर्तव्य बजावण्यापेक्षा इतर बाबींकडे जास्त लक्ष देत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. वाहन चाेरी, गाेधन चाेरी तसेच घरफाेडीच्या घटनांमधील आराेपींचा सुगावा काढून त्यांना बेड्या ठाेकण्यात ही पथके कुचकामी ठरत असल्याचे समाेर आले आहे. आराेपींना अटक हाेत नसल्यामुळे की काय, चाेरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. या सर्व बाबींचे सुक्ष्म अवलाेकन केल्यानंतर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सिव्हील लाइन व खदान पाेलिस स्टेशनमधील ‘डीबी स्काॅड’बरखास्त केल्याची माहिती आहे. ‘त्या’दाेन कर्मचाऱ्यांचा बाेलबालाखदान पाेलिस स्टेशनमधील गुन्हे शाेध पथकात सामील असलेल्या ‘त्या’दाेन कर्मचाऱ्यांनी स्वत:चे खिसे भरण्यासाठी पाेलिस यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. फिर्यादी काेणाविराेधात तक्रार करणार याची कुणकुण लागताच गैरअर्जदाराशी संपर्क साधणे, बाेलणीचे सर्वसाेपस्कार पूर्ण झाल्यानंतर तक्रार न देण्यासाठी फिर्यादीचे मन वळविणे, अवैध गुटखा व्यावसायिक, जुगार,वरली व्यावसायिकांकडून खिसे जड करुन घेणाऱ्या ‘त्या’दाेन पाेलिस कर्मचाऱ्यांसह पथकाचे एकूणच वर्तन पाहता पाेलिस यंत्रणेच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्हं उपस्थित हाेऊ लागले हाेते. प्रकरणांचा बाहेर निपटारा
सिव्हील लाइन पाेलिस ठाण्याच्या हद्दीत शाळा, महाविद्यालये, खासगी काेचिंग क्लास व इंटरनेट कॅफेंची माेठी संख्या आहे. त्यामुळे मुलींची छेडखानी, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना दमदाटी करुन पैसे उकळण्याचे प्रकार सतत हाेतात. यासंदर्भातील तक्रारींचा पाेलिस ठाण्याच्या बाहेरच निपटारा करण्यात ‘डीबी स्काॅड’व्यस्त असल्याचे बाेलल्या जात हाेते. या सर्व प्रकारापासून पाेलिस ठाण्यांतील वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ कसे, असा सवाल उपस्थित झाला आहे.