महान : काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी दोन सिंचन व्हॉल्व्हमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दोन्ही व्हॉल्व्हमधून प्रत्येकी १५० क्युसेसप्रमाणे ३०० क्युसेक पाणी नदीपात्रात विसर्ग करणे सुरू केले आहे. त्यामुळे काटेपूर्णा नदी दुथळी भरून वाहत आहे. धरणाचे पाणी नदी पात्रात सोडल्याने नदी काठावरील गावांनाही त्याचा लाभ होणार आहे.महान धरणाच्या पाण्यावर नदीकाठावील शेकडो व्हेक्टर जमिनीवर या वर्षी गहू, हरभरासह भाजीपालाचा पेरा सर्वाधिक होणार आहे. महान धरणाच्या पाण्यावर महानपासून ते खांबोरा, उन्नई बंधाऱ्यावरील अनेक भागात शेतकरी वर्ग भाजीपाल्यांचा मोठ्या प्रमाणात पेरा करीत असतात. यावर्षी महान धरणात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही, हे विशेष. गेल्या वर्षी महान धरणात १६ डिसेंबर २0१८ रोजी ६४.५४ टक्के जलसाठा शिल्लक होता. यावर्षी १६ डिसेंबर २0१९ रोजी महान धरणाचा जलसाठा ९८.९३ टक्के एवढा उपलब्ध असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात आज स्थितीला ३५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दरवर्षी शेतकºयांना रब्बी सिंचनाकरिता १ नोव्हेंबरपासून धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात येते; परंतु काही कारणास्तव यावर्षी धरणाचे पाणी उशिराने सोडण्यात आले. वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत धरणाचे दोन्ही सिंचन व्हॉल्व्हमधून पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.धरणातील जलसाठ्याकडे उपविभागीय अधिकारी नितनवरे, शाखा अभियंता घारे, एस.व्ही. जानोरकार, पिंपळकर, अमोल जोशी, पाठक, खरात, हातोलकर, आगे, झळके, टेमधरे हे नियोजन करीत आहे. (वार्ताहर)
काटेपूर्णा धरणाच्या दोन व्हॉल्व्हमधून सिंचनासाठी ३00 क्युसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:01 PM