अतुल जयस्वाल अकोला, दि. ९- उन्हाळय़ाची चाहूल लागल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासन संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यात मग्न असतानाच, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १३२४ पाणी नमुन्यांपैकी १३६ नमुद्मो दूषित आढळून आले आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पाण्याचे स्रोत दूषित असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वास्तव आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत फेब्रुवारी महिन्यात जिल्हय़ातील ३0 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ८0७ गावांमध्ये पाणीपुरवठा करणार्या नळ पाणीपुरवठा योजना, विहिरी, हातपंप इत्यादी जलस्रोतांचे पाणी नमुने आरोग्य कर्मचार्यांकडून घेण्यात आले. जिल्हय़ातील सातही तालुक्यांमधील ८0७ गावे आणि नागरी भागांमध्ये घेण्यात आलेले १ हजार ३२४ पाणी नमुने जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या मुख्य अनुजीव शास्त्रज्ञांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. या पाणी नमुने तपासणीचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून ८ मार्च रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला प्राप्त झाला. या अहवालानुसार १३६ पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले. पाणी नमुने दूषित आढळून आल्याने, संबंधित जलस्रोतांचे पाणी पिण्यासाठी योग्य नसले, तरी नागरिकांना या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत आहे. पिण्यासाठी दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ४१ गावे ब्लिचिंग पावडरविनाजिल्हय़ातील सात तालुक्यांपैकी अकोला, बाश्रीटाकळी, बाळापूर, पातूर या चार तालुक्यांतील ४१ गावांमध्ये पाणीपुरवठा करताना ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नसल्याचे आढळून आले. अकोला तालुक्यातील १९, बाश्रीटाकळी तालुक्यातील पाच, बाळापूर तालुक्यातील १५ आणि पातूर तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. मूर्तिजापूर, अकोट व तेल्हारा तालुक्यांमध्ये मात्र सर्व गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे.९ ग्रामपंचायतींना 'रेड कार्ड'ज्या पाण्याच्या स्रोतावर गावातील ७0 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या अवलंबून असते, अशा स्रोतांचे पाणी नमुने दूषित आढळून आल्यास त्या ग्रामपंचायतींना ह्यरेड कार्डह्ण जारी केले जाते. जिल्हय़ात ९ ग्रामपंचायतींना रेड कार्ड देण्यात आले आहे.
दूषित पाण्याचा जिल्ह्याला विळखा!
By admin | Published: March 10, 2017 2:35 AM