शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

युतीची चर्चा; आघाडीचे गुऱ्हाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 1:10 PM

भाजपाच्या गोटातून युतीबाबत सकारात्मक विधाने बाहेर येऊ लागल्याने, पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीने जागा वाटपाची चर्चा सुरू केल्यामुळे आता आघाडीचे गुऱ्हाळही सुरू झाले आहे.

- राजेश शेगोकारअकोला : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, पश्चिम वऱ्हाडातही सर्वच पक्षांना वेध लागले आहे. गेल्या चार वर्षांत भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांमध्ये एकमेकांवर सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण, आरोप-प्रत्यारोपांचे सत्र पाहता पुढील निवडणुकीत युती होण्याची शक्यताच वर्तविली जात नव्हती. त्यामुळेच शिवसेनेने स्वबळाचा नारा देऊन युती नाहीच, यावर शिक्कामोर्तबही केले; मात्र सेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपावर टीकेची झोड उठविली असली, तरी स्वबळाचा जागर मात्र तेवढ्या दमदारपणे झाला नाही तर भाजपाच्या गोटातून युतीबाबत सकारात्मक विधाने बाहेर येऊ लागल्याने, पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीने जागा वाटपाची चर्चा सुरू केल्यामुळे आता आघाडीचे गुऱ्हाळही सुरू झाले आहे. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस असो की शिवसेना, भाजपा असो हे चारही पक्ष एकमेकांचे नैसर्गिक मित्र आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या या जोड्या आता पुन्हा जोडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे असून, तसे झाले तर पश्चिम वऱ्हाडातील राजकीय समीकरणांची नव्याने मांडणी करावी लागणार आहे.अकोला, बुलडाणा व वाशिम-यवतमाळ या तीन लोकसभा मतदारसंघांत सध्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. अकोल्याची जागा भाजपाच्या ताब्यात असून, येथे भाजपाचा एकछत्री अंमल आहे. अकोल्याच्या राजकारणात खा. संजय धोत्रे यांचा प्रभाव सर्वश्रुत आहे. अकोला महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून त्यांनी आपली पकड दाखवून दिली. जिल्ह्यातील नगरपालिकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळाले, त्यामुळे विरोधी पक्षांमध्येसुद्धा खा. धोत्रे यांना तोडीस तोड लढत देणाºया उमेदवारांची वानवा आहे. भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे खा. धोत्रे यांच्याविरोधात सक्षम पर्याय होऊ शकतात; मात्र मत विभाजनामुळे त्यांची ताकद विजयापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे खा. धोत्रे यांची ताकद वाढली आहे. शिवसेनेला खा. धोत्रे यांच्याविरोधात उमेदवाराचा शोध आहे. सेनेचे नेते विजय मालोकार, गोपाल दातकर आदी नावांसह आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याही नावाची चर्चा अधूनमधून होत असते; मात्र सेनेने लोकसभा केंद्रित मानून एखादा उमेदवार प्रोजेक्ट करण्याचे काम अजूनपर्यंत तरी सुरू केलेले नाही. सेनेच्या पक्षांतर्गत बैठका वाढल्या, कार्यक्रम वाढले. या सर्व कार्यक्रमांमध्ये स्वबळाचाच नारा दिला जात आहे, त्यामुळे खासदारकीचा उमेदवार कोण, याची उत्सुकता शिवसैनिकांनाही आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीच्या जागा अदलाबदलीमध्ये पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम-यवतमाळ या दोन लोकसभा मतदारसंघांवर राष्टÑवादीचा डोळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोल्यात १९८४ पासून सातत्याने काँग्रेसचा पराभव होत आहे.१९९८ व १९९९ या लागोपाठ झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना उमेदवार करून यश मिळविता आले; मात्र अ‍ॅड. आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपाने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकरांनी आघाडीत यावे, असे प्रयत्न सातत्याने होत आहेत. त्यात यश येण्याची शक्यता आता कमीच आहे. या पृष्ठभूमीवर काँग्रेसला एकतर उमेदवार आयात करावा लागेल किंवा पुन्हा एकदा मत विभाजनाची खेळी करण्यासाठी उमेदवार द्यावा लागेल; मात्र त्याचा फायदा भाजपालाच होतो, हा अनुभव असल्याने काँग्रेस कोणती खेळी करते, यावरही निवडणुकीची रंगत ठरणार आहे. राष्टÑवादी काँग्रेसला हा मतदारसंघ हवा आहे. या पक्षाकडे उमेदवारांची मोठी वेटिंग लिस्ट आहे; मात्र त्यापैकी जवळपास सर्वांना विधानसभेत रस असल्याने खासदारकीसाठी कोणाची सक्रियता दिसत नाही. डॉ. अभय पाटील यांनी लोकसभेची तयारी सुरू केल्याचे दिसत असले, तरी त्यांचा काँग्र्रेस व राष्टÑवादी काँग्रेस अशा दोन्ही तबल्यावर हात आहे. त्यामुळे त्यांना कोणता पक्ष हात देतो, यावरच त्यांचे राजकीय भविष्य ठरणार आहे. दुसरीकडे माजी आमदार तुकाराम बिडकर यांना रिंगणात उतरविण्याचीही चाचपणी पक्षाने केल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपा-सेनेची युती झालीच नाही, तर काँग्रेस आघाडीचा सक्षम उमेदवार अकोल्याच्या राजकारणाचे समीकरण बिघडवून शकतो, अशी स्थिती आहे.वाशिम-यवतमाळमध्ये सलग तिसºयांदा विजय प्राप्त करीत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी आपले वर्चस्व या मतदारसंघावर निर्माण केले आहे. या मतदारसंघावर युतीत भाजपाने, तर आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे. त्यामुळे येथे मित्रपक्षांमध्येच कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला गेला असला, तरी ऐनवेळी हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी युती होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात येथे फारसे चिंतेचे वातावरण नाही; मात्र दुसरीकडे युतीचे फिस्कटले आणि प्रत्यक्ष लढण्याची वेळ आलीच, तर भाजपानेही तयारी सुरू केली आहे. भाजपात जवळपास चार ते पाच नावे चर्चेत आहेत. अशीच वर्चस्वाची लढाई काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसमध्येही आहे.सेनेचे वर्चस्व मोडून काढण्यात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके आदी नेत्यांना सातत्याने अपयश आले आहे. एकीकडे सेनेला रोखता येत नाही अन् दुसरीकडे काँग्रेस अंतर्गत गटबाजी थांबविता येत नाही, अशी स्थिती या नेत्यांची आहे. त्यामुळे राष्टÑवादीने या मतदारसंघावरचा दावा प्रबळ केला आहे. माजी मंत्री मनोहरराव नाईक, सुभाष ठाकरे या दोघांच्या नावाची चर्चा आहे. युती झाली नाही आणि सेनेतील भावना गवळी-संजय राठोड या दोन गटातील संघर्ष किती टोकाला जातो, यावरही आघाडीची गणिते मांडली जात आहेत.बुलडाण्याची जागा शिवसेनेकडे आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी भाजपासोबत समान अंतर ठेवत सेना वाढविण्याचे काम केले; मात्र २०१४ च्या निवडणुकीपासून भाजपानेही आपली पाळेमुळे घट्ट केल्यामुळे आता भाजपाही लोकसभा मतदारसंघाचा दावेदार झाला आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत भाजपाने सत्ता स्थापन करण्यासाठी सेनेला बाजूला ठेवत चक्क राष्टÑवादीला हाताशी घेतल्यामुळे सेनेला जागा दाखविण्याचे काम भाजपाने केले.या घडामोडीनंतर भाजपाने प्रत्येक ठिकाणी आक्रमक भूमिका घेत पक्षाचा विस्तार केला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी धुरा सांभाळत तोच आक्रमकपणा कायम ठेवल्याने उद्या युती झाली नाही, तर भाजपा स्वबळावर लढण्यास सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडेही दमदार उमेदवारांची फळी असल्याने भाजपाकडे पर्याय तयार आहेत. दुसरीकडे काँग्रेस आघाडीमध्येही मतदारसंघाच्या अदलाबदलीचे वारे आहेत. सध्या राष्टÑवादीकडे असलेल्या या मतदारसंघात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे एकमेव हुकुमाचे पान राष्टÑवादीकडे आहे. या मतदारसंघावर काँग्रेसही दावा करीत आहे. जर आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली, तर येथे स्वाभिमानीचाही दावा या मतदारसंघावर राहणार असल्याने या लोकसभा मतदारसंघाची गणिते आघाडी व युतीचे चित्र स्पष्ट झाल्यावरच ठरणार आहेत. सध्यातरी फक्त चर्चांचे फड रंगत असून, वाढत्या थंडीत राजकारण मात्र गरम होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस