शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

राजकीय वर्तुळात टक्केवारीच्या गणितावर रंगताहेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:50 PM

- आशिष गावंडे अकोला :लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात रणशिंग फुंकले. ...

-आशिष गावंडेअकोला:लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभरात रणशिंग फुंकले. अ‍ॅड. आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्या विरोधात आणि सोलापूर मतदारसंघातूनही निवडणूक लढवली. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या दोन्ही मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे. यादरम्यान, २०१४ च्या तुलनेत यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत मतदानात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये १ लक्ष ४४ हजार ४७८ नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे ही वाढीव टक्केवारी नेमकी कोण्या उमेदवाराच्या पथ्यावर पडणार आणि कोण ‘बाजीगर’ ठरणार यावर जिल्हाभरात चर्चेचे फड रंगले आहेत.सतराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी राजकीय पक्षांसह निवडणूक विभागाने जनजागृती मोहीम व प्रचार-प्रसार केला. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले. २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा नवीन मतदारांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाल्याचे दिसून आले. गतवेळी राजकीय पटलावरील वेगवान घडामोडी व मोदी लाट पाहता यावेळी मतदानाची टक्केवारी वाढणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. भाजप-शिवसेना महायुती, वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतरही जिल्ह्यात जाहीर सभा, दौºयांचा धडाका दिसत नसल्याचे चित्र होते. २०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण १६ लक्ष ६९ हजार ८६१ मतदारांपैकी ९ लक्ष ७२ हजार २८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी एकूण ५८.२२ टक्के मतदान झाले होते. यंदा १८ लक्ष ६१ हजार ७३९ मतदारांपैकी ११ लक्ष १६ हजार ७६३ मतदारांनी आपल्या अधिकाराचा वापर केला. यावेळी ६० टक्के मतदान झाले असून, गतवेळच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते. एकूणच, २०१४ मधील निवडणुकीच्या तुलनेत २०१९ मधील निवडणुकीत १ लक्ष ९१ हजार ८७८ नवीन मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, यापैकी तब्बल १ लक्ष ४४ हजार ४७८ मतदारांनी मतांचे दान केल्याचे समोर आले आहे. ही वाढीव टक्केवारी खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे, काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल तसेच वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर या तिघांपैकी नेमकी कोणाच्या वाटेला गेली, यावर चर्चेच्या फैरी झडू लागल्या आहेत.भाजपचा आलेख चढताच! २००९ मधील निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खा.अ‍ॅड. संजय धोत्रे यांना २ लक्ष ८७ हजार ५२६ मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत खा. धोत्रे यांच्या मताधिक्यात वाढ होऊन त्यांना ४ लक्ष ५६ हजार ४७२ मते मिळाली होती. यंदा मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ पाहता खा. धोत्रे यांना किती मते मिळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.‘वंचित’च्या लढतीकडे लक्षअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यंदा दहाव्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी विद्यमान खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे, काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्यासमोर आव्हान उभे केले. भाजप व वंचितने जिल्ह्यात ‘बुथ मॅनेजमेंट’च्या माध्यमातून शतप्रतिशत मतदानासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे दिसून आले. मागील लोकसभेच्या मतदानाच्या तुलनेत यंदाचे मतदान२०१४- ९,७२,२८५२०१९- ११,१६,७६३१,४४, ४७८ (वाढलेले मतदान)गेल्या निवडणुकीतील निकालपक्षमतेभाजप४,५६,४७२काँग्रेस२,५३,३५६भारिप-बमसं२,३८,७७६मतदानाची टक्केवारी२००९- ४९.५४ २०१४- ५८.२२२०१९- ५९.९८
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोला