अकोला : शिक्षण क्षेत्रातील रास्त समस्यांसंदर्भात शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा केली. या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले. चर्चेत आर.टी.ई. मधील धोरणातील बाबींमुळे शिक्षणात येत असलेल्या समस्यांच्या मते प्रत्यक्षात विनाअट वर्ग ५ व वर्ग ८ सुरू करण्यात आला नसल्याने राज्यात अतिरिक्त शिक्षक झाले आहेत, उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पदावनती चुकीच्या धोरणामुळे होत असल्याने शिक्षण क्षेत्र प्रभावित होत आहे. तसेच वर्ग १ ते ८ च्या शाळेला पटसंख्येची अट न ठेवता मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी, ह्यगाव तिथे शाळाह्ण या धोरणातील विसंगती यावर पदाधिकार्यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले. शाळेतील विद्युत बिलाचा दर घरगुती आकारण्याचे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत, शिक्षकांकडे वर्षभर बी.एल.ओ. चे कार्य असल्याने संबंधित शिक्षक वर्षभर मतदार नोंदणी कार्यात गुंतलेले असल्याने शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची वाताहत होत आहे. या संबंधी सादर झालेल्या प्रस्तावानुसार शिक्षण विभागाशिवाय अन्य विभागाचे आदेश शिक्षकांना लागू होणार नाहीत, असे मत व्यक्त करीत यासंबंधी लवकरच आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन दिले.
शिक्षणमंत्र्यांसोबत शिक्षक संघटनांची चर्चा
By admin | Published: December 04, 2014 1:23 AM