शेतकरी संकटात : उत्पादनात घट येण्याची भीतीलोकमत न्यूज नेटवर्कवाकद (वाशिम) : रिसोड तालुक्यातील वाकद परिसरात सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. यावर्षी शेतकºयांना नानाविध संकटातून जावे लागत आहे. कधी पावसाची दीर्घ दडी तर कधी संततधार पाऊस, पावसाची रिपरिप यामुळे अगोदरच पिकांना फटका बसला आहे. वातावरणातील बदलामुळे सोयाबीनवर आता करपा व मुळकूज रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अतिपावसामुळे मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे सांगितले जाते. पिकांच्या मूळांजवळ पाणी साचून राहिल्यास मुळांची श्वसनाची क्रिया मंदावते. परिणामी अन्नद्रव्य शोषण व जमिनीत आधार मिळविणे या दोन्ही कार्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. फुलोरा किंवा फळवाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकात अन्नद्रव्यांचा भरपूर पुरवठा आवश्यक असतो. अतिरिक्त पाण्यामुळे मुळांची कार्यक्षमता घटून अन्नद्रव्यांचा पुरवठा अपुरा होतो. परिणामी पिकाच्या वाढीवर दुष्परिणाम होऊन उत्पादनात व दर्जात घट होण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. सोयाबीनच्या शेंंगा काळया पडत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कृषी विभागाच्या चमूने २६ आॅगस्ट रोजी भेट देऊन शेतकºयांना फवारणीसंदर्भात मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या सल्ल्याने काही शेतकºयांनी फवारणीदेखील केली. करपा व मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नुकसानभरपाई देण्याची मागणी सुरेश लाटे, भिकन खॉ पठाण, दत्तात्रय अवताडे यांच्यासह शेतकºयांनी बुधवारी केली.
वाकद परिसरातील सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:33 PM