अकोला : विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी राज्यात आक्रीत घडल आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने जनतेचा कौल नाकारून पराभूत झालेल्या दोन पक्षांच्या सोबतीने सरकार स्थापन केले. हा प्रकार बेइमानीचा आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ हा प्रकार चालणार नाही, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दगडपारवा येथील प्रचार सभेत सांगितले. यावेळी त्यांनी विविध मुद्यावर त्यांनी महाआघाडी सरकारचा समाचार घेतला.जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणूकीसाठी शनिवारी पहिली सभा अकोला जिल्ह्यातील दगडपारवा येथे पार पडली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.पुढे बोलताना फडणवीस यांनी विधानसभा निवडणूकीनंतर जनतेच्या कौलानुसार भाजप-सेनेचे सरकार स्थापन होणे क्रमप्राप्त होते. मात्र, शिवसेनेने वेगळाच इतिहास घडवला. स्वार्थासाठी कोणी काहीही करू शकते. हेच त्यातून दाखवून दिले. जनतेने हरवलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्याचं सरकार जनतेच्या मनातल नाही. भाजप आणि मतदारांसोबत विश्वासघात करून तयार झालेले ते सरकार आहे, असेही ते म्हणाले. भारताचा इतिहासात बेइमानीने मिळवलेले राज्य कधीच दिर्घकाळ चालले नाही. ते सहा महिन्यातच लयास गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच आधी सत्ता स्थापन करणे, त्यानंतर मंत्रीपद वाटप, मंत्र्यांना खातेवाटप करण्यात कमालीचा विलंब लागत आहे. त्याचवेळी कॅबिनेटची मागणी असताना राज्यमंत्री पद दिल्याने नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी आजच राजीनामा दिला. ही बाब सरकार अधिक चालणार नसल्याचे संकेत आहेत, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक आमदार हरिष पिंपळे यांनी केले.- कर्जमाफी, दुष्काळी मदत, शिवभोजनातून सरकार तोंडघशीसात-बारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने कर्जमाफी करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शासन निर्णयातील अटी व शर्तींमुळे शेतकºयांना प्रत्यक्ष लाभ मिळणारच नसल्याचेही फडणवीस म्हणाले. बांधावर जाऊन २५ हजार रुपये मदत देण्याची घोषणा केल्यानंतर त्याची पूर्तताही केली नाही. तर शिवभोजनातून किती लोकांची भूक शमवली जाणार, त्यातूनही गरिबांची थट्टाच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.