बाळापूर (अकोला), दि. ७- वृद्ध आई-वडिलांना जेवण का दिले, या कारणावरून एकावर कुर्हाडीने हल्ला केल्याची घटना व्याळा येथे ७ जानेवारी सकाळी १0.३0 वाजता घडली. व्याळा येथील वासुदेव तेजराव सोळंके हे शेजारील वृद्धांना सामाजिक दायित्व म्हणून जेवण देतात. ही बाब वृद्ध आई-वडिलांचा मुलगा व सून यांना खटकली. त्यांनी याविषयी ७ जानेवारी रोजी सकाळी सोळंके यांना जाब विचारण्यासाठी त्यांचे घर गाठले. व शिवीगाळ करून सोबत आणलेल्या कुर्हाडीने हल्ला केला. यामध्ये सोळंके गंभीर जखमी झाले. याप्रकरणी वासुदेव सोळंके यांच्या फिर्यादीवरून राहुल उत्तम वानखडे व त्याची पत्नी आम्रपाली राहुल वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आई-वडिलांना जेवण देणार्यावर कु-हाडीने हल्ला
By admin | Published: January 08, 2017 2:48 AM