लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : पातूर तालुक्यातील पास्टुल या गावामध्ये बिबट्याची फार मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली असून, गावासह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.२८ मे रोजी पास्टुलमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन गुरे ठार झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्या दिवसापासून प्रत्येक रात्री बिबट्या गावालगत येऊन हैदोस घालत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. नदीकाठच्या लोकांना रात्रीत जागरण करण्याची वेळ आली असून, भीतीपोटी ते झोपसुद्धा नाहीत. एखाद्या दिवशी माणसावर हल्ला करून त्यात माणसाचा जीवसुद्धा जाऊ शकतो, असे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाला याबाबत वेळोवेळी माहिती दिली असून, वन विभाग याबाबत ठोस उपाययोजना करीत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पास्टुल ग्रामस्थांना विनंती आहे, की पहाटे ४ ते ७ च्या व रात्री ८ ते ११ च्या दरम्यान एकट्याने बाहेर पडू नये, तसेच बिबट्या दिसल्यास त्याला इजा करण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न करू नये.- एस. व्ही. देवरे, वन परिक्षेत्र अधिकारी, पातूर.बिबट्या रोज रात्री हैदोस घालत असून, एखादेवेळी माणसावर हल्ला करू शकतो. वन विभागाने याबाबत ठोस उपाय करावे.- भानुदास घुगे, सरपंच, पास्टुल.
पास्टुल गावात बिबट्याची दहशत
By admin | Published: June 06, 2017 8:05 PM