अकोटः तालुक्यातील अकोलखेड परिसरातील दोन नदीच्या मध्यभागी ई-क्लास जागेवर चोरी करण्याच्या उद्देशाने साठा केलेल्या रेतीची चोरी होण्यापूर्वीच रेतीची विल्हेवाट लावण्याची कारवाई दि. १५ मे रोजी महसूल पथकाने केली. पठार व खाई नदीचे पात्रातील ई-क्लास जागेवरील नदीचे भागात रेतीचे उत्खनन करुन साठा करुन ठेवल्याचे माहितीवरून महसूल विभागाने १२ ब्रास रेतीची चोरी होण्यापूर्वीच पंचनामा करुन विल्हेवाट लावली. ही कारवाई नायब तहसीलदार हरीश गुरव, मंडळ अधिकारी निळकंठ नेमाडे, तलाठी अनिल रावणकार, कोतवाल नारायण तायडे यानी केली. (फोटो)
...................
संचारबंदीत भाजीपाला विकणाऱ्यांवर कारवाई
अकोटः जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असल्याने किराणा व भाजी बाजार बंद ठेवण्यात येत आहे ; मात्र तरीही या निर्बंधांना झुगारून शहरातील यात्रा चौक, कॉलेज रोड याकूब पटेल चौक, भागात फळे भाजीपाला विकून निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दि. १५ मे रोजी नगरपालिकेच्या पथकाने माल जप्तीची कारवाई केली आहे. ही कारवाई नगरपालिका मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक चंदन चंडालीया, तसेच सफाई कर्मचारी सचिन तेलगोटे, अमित बेंडवाल, हितेश मर्दाने, निलेश बागडे, दिनेश मर्दाने, राजेंद्र वानखेडे आदी कर्मचाऱ्यांनी केली.
.............................
अकोट येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
अकोट ः महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक भवानी पुरा येथील भुलजा भुलाई मंदिर परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे तहसीलदार निलेश मडके व सिदू वानखडे यांच्या हस्ते हारार्पण व पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला गणेश आप्पा मेनसे, वसंत आप्पा गोरे, नाना आप्पा कुरवाडे, आनंद बेदरकर, प्रतीक गोरे, महेश इंगोले, महेश कुरवाडे, गोविंदा मनसे, शुभम कुरवाडे, सोमेश कुरवाडे, सचिन डफडे, ईश्वर कैसर, सोमेश कुरवाडे, प्रसाद पिंजरकर आदी उपस्थित होते.
...................