भावेश सिसोदिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि.२१ मे रोजी सायंकाळच्या सुमारास मोहसिन शहा व आणखी एक असे दोघे घरात असलेल्या किराणा दुकानाजवळ आले. त्यांनी सामान खरेदीवरून वाद घातला. मोहशीनने त्याचा भाऊ शकील यास फोन करून भावेशसह अनेकांनी मारहाण केल्याचे सांगितले. यावरून एजाज शहा, दानिश शहा, शहबाज शहा, शाहिद शहा, युसुफ शहा, गुलजम शहा, समीर शहा, शब्बीर यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शकील शहा याने फिर्यादीच्या पत्नीचा हात पकडून थापड मारून अश्लील शिवीगाळ केली. या तक्रारीवरून तेल्हारा पोलिसांनी मोहसीन शहा यांच्यासह वर नमूद आरोपींसह जायीश शहा, राजिक शहा अशा १३ जणांवर गुन्हे दाखल केले. तर दुसऱ्या प्रकरणात शकील शहा जमीर शहा (रा. आठवडी बाजार) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचा भाऊ मोहसीन याने आरोपी सुरेश बाबूलाल सिसोदिया, विशाल सुरेश सिसोदिया, भावेश सुरेश सिसोदिया यांच्याकडे गाडी भाड्याचे उसणे असलेले पैसे मागितले. तेव्हा टाळाटाळ करून सुरेश, विशाल, भावेश व राजेश मांगीलाल पवार, विजय मांगीलाल पवार यांनी वाद घातला. भावेशने फिर्यादीच्या भावाच्या पत्नीस अश्लील शिवीगाळ केली. मोहसीन यास लोखंडी पाईपने मारले. या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी दि.२२ मे रोजी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दोन गटात वाद; परस्परविरोधी तक्रारीवरून १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:18 AM