लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्राहक मंचाने १९ जून २०१८ रोजी दिलेल्या आदेशाची पूर्तता न केल्याने ग्राहक मंचाने गुरुवारी सारडा बंधूंना दोन वर्षांची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.सारडा आॅइल इंडस्ट्रीजसह भागीदारी फर्म व त्याचे भागीदार भरत रामपाल सारडा, शरद रामपाल सारडा व अजय रामपाल सारडा यांच्याविरुद्ध दिलीप गोयनका व राहुल गोयनका यांनी ग्राहक मंचामध्ये तीन वेगवेगळ्या तक्रारी केल्या होत्या. या तिन्ही प्रकरणांमध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने १९ जून २०१८ रोजी आदेश पारित करून प्रत्येक तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर केली होती. याप्रकरणी ग्राहक मंचाने सारडा आॅइल इंडस्ट्रीजसह भागीदारी फर्म व त्याचे भागीदार भरत रामपाल सारडा, शरद रामपाल सारडा व अजय रामपाल सारडा यांनी तिन्ही प्रकरणातील तक्रारकर्त्यांच्या ठेवीची रक्कम व्याजासह द्यावी, शिवाय तक्रारकर्त्यास झालेला मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून पाच हजार व प्रकरणाचा खर्च तीन हजार रुपये ४५ दिवसांत द्यावा, असा आदेश दिला होता. या आदेशाची पूर्तता न झाल्याने याप्रकरणी ग्राहक मंचामध्ये गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी करण्यात आली.यावेळी ग्राहक मंचाने तिन्ही प्रकरणांत सारडा आॅइल इंडस्ट्रीज, भागीदारी फर्म व त्याचे भागीदार भरत सारडा, शरद सारडा व अजय सारडा यांना दोषी ठरवित दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
ग्राहक मंचाच्या आदेशाची अवहेलना; सारडा बंधूंना दोन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 10:56 AM