----------------------------------------
भांबेरी येथे बाबासाहेबांना अभिवाद
भांबेरी: येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोविड-१९च्या नियमांचे पालन करण्यात आले.
-------------------------------------------
बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
वाडेगाव: मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे, वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.
-----------------------------------------
काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन
बार्शीटाकळी : शहरासह तालुक्यात गत काही दिवसापासून काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, काेराेना विषयी गांभीर्यच नसल्याचे चित्र असून नियमांचे उल्लंघन हाेत आहे. प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाइ करण्याची गरज आहे.
---------------------------------------------
पाणंद रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
बाळापूर : परिसरासह तालुक्यातील पाणंद रस्त्यांची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना शेतमाल घरी आणता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी राेजगार हमी याेजनेतून पाणंद रस्त्याची दुरुस्तीची मागणी हाेत आहे.
-----------------------------------
पक्ष्यांसाठी जलपात्र ठेवण्याचे आवाहन
अंदूरा : मार्चच्या पूर्वार्धात उन्हाची दाहकता वाढत आहे. पक्ष्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पक्ष्यांसाठी घराच्या छतावर जलपात्र ठेवण्याचे आवाहन येथील पक्षिप्रेमींकडून होत आहे.
------------------------------
गहू उत्पादक शेतकरी संकटात!
पातूर : गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने तालुक्यात रब्बीची पेरणी वाढली आहे. यंदा शेतकऱ्यांनी गव्हाला पसंती दिली आहे. सद्यस्थितीत गहू काढणीला आला असून, ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
----------------------------
बोरगाव मंजू येथे मोबाइल सेवेचा फज्जा
बाेरगाव मंजू : बीएसएनएल तसेच इतर मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कअभावी गत अनेक महिन्यांपासून ग्राहक त्रस्त झाले आहेत. मोबाईल सेवा तासनतास खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
------------------------------
बंदी असतानाही गुटख्याची विक्री
अकोट : गुटख्याच्या विक्रीला बंदी असतानाही तालुक्यात अनेक भागात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे बहुतांश नागरिक गुटख्याचे सेवन करत आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
--------------------------------------
पुनोती येथे आणखी एक पॉझिटिव्ह
बार्शिटाकळी: तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यातील पुनोती येथे आणखी एक पॉझिटिव्ह आढळून आला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------------------
तेल्हारा येथे कोरोनामुळे एकाचा मृत्यू
तेल्हारा: शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच असून, बुधवारी सायंकाळी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------------------------
अनेक लाभार्भी घरकुलापासून वंचित
आगर : घरकूल लाभार्थी यादी गेल्या दोन तीन वर्षांपासून मंजूर असून, अतिक्रमण जागेबाबत प्रश्न मार्गी न लागल्याने पात्र असतानाही अनेक लाभार्थी घरकूल लाभापासून वंचितच असल्याचे दिसून येत आहे