पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून निकष सुध्दा बदलून अनेक शेतकरी लाभार्थी या योजनेचा लाभ घेत होते. आतापर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक तीन हप्ते सहा हजार रुपये अनुदान जमा होत होते. दरम्यान २०२१ मे मध्ये देण्यात आलेला सन्मान योजनांचा लाभ, अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. यासाठी अनेक खातेदार शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन शहानिशा केल्यानंतर तहसील कार्यालय गाठून चौकशी केली. परंतु शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांना परत पाठविले जात आहे.
अनुदान जमा न करण्याचे कारण नाही!
सन्मान योजनेतर्गंत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले नाही. यांची कारणे मात्र सांगितले जात नसल्याने हजारो शेतकरी लाभापासून वंचित ठेवले गेले आहेत. या संदर्भात प्रशासनाने वंचित राहिलेले शेतकरी यांना लाभ देण्याची मागणी केली आहे.
संदेश आले, खात्यात अनुदान आलेच नाही!
पीएम शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे. अशा प्रकारचे संदेश परिसरातील शेकडे शेतकऱ्यांना आले. परंतु शेतकरी बॅंकेत गेले असता, खात्यात अनुदान जमा झाले नसल्याचे समोर आले आहे. हजारो शेतकरी लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले आहेत.