...............................................
‘एनआरएचएम’ अंतर्गत कामांचा आज आढावा!
अकोला : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा आज, शुक्रवारी घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड, जिल्हा परिषदेतील सत्तापक्ष गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले यांच्याकडून ‘एनआरएचएम’ अंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.
...................................................
शेती मशागतची कामे अंतिम टप्प्यात!
अकोला : पावसाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध भागात सुरू असलेली शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, खरीप हंगामातील पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पेरणीसाठी बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
.............................................
‘आपत्ती व्यवस्थापन साहित्याचा अहवाल सादर करा !’
अकोला : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध साहित्याची पाहणी करून, अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना गुरुवारी दिले. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सादर करण्याच्या सूचनाही तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.
............................................
महसूलविषयक कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा !
अकोला : जिल्ह्यातील महसूलविषयक कामांचा आढावा जिल्हाधिकारी जितेेंद्र पापळकर यांनी बुधवारी घेतला. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासह सात बारा संगणकीकरण, रोहयो, दाखल्यांचे वितरण व पुरवठा विभागांतर्गत कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
......................................................
घरकुल कामांच्या मुद्द्यावर
‘सीइओ’ आज घेणार बैठक !
अकोला : रमाई आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील घरकुल कामांच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) आज, शुक्रवारी जिल्हा परिषदेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. घरकुलांची पूर्ण झालेली कामे आणि प्रलंबित असलेली कामे यासंदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.
......................................................