गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांसह प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याची चाळण झाली आहे. प्रवासी व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांची संख्या पाहता, खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा हेच समजत नाही. अनेकवेळा खड्डे वाचविण्याच्या नादात अपघात सुद्धा घडतात. चोहोट्टा बाजार- अकोट-अकोला येथे जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्यामुळे दवाखान्यात रुग्णाला नेण्यासाठी कसरत करावी लागते. रस्त्याची दूरवस्था झाली असल्याने, रुग्णवाहिका सुद्धा गावापर्यंत यायला तयार होत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्तीची मागणी गावातील राजुभाऊ लोहकपुरे, ग्रामपंचायत सदस्य चेतन फुकट, राहुल वानखडे, आशिष बरदिया, अमोल बुंदे, बंडुभाऊ बुटे, आदिनाथ खोबरखेडे, गोपाल तुकाराम बुटे, बाळकृष्ण भदे, सूरज बरडिया, सतीश बुटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोट तालुका सहसंपर्क प्रमुख गणेश बुटे, मोहन नावकार, चंद्रशेखर आढे, अमोल आढे, शुभम इंगळे आदींनी केली आहे.
फोटो: पनोरी नावाने