यावेळी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गजभिये , सहा.अधिष्ठाता डॉ. घोरपडे,वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिरसाम जलसा कमिटी अध्यक्ष हाजी मुदाम डॉ.नेताम, डॉ.सचिन गाडगे, डॉ. आशिष माल, डॉ.सुष्मिता पवार,जमात चे अध्यक्ष जावेद जकरिया, बैदपुरा युवा मंचचे अध्यक्ष तनवीर खान आदी उपस्थित होते.
फाेटाे
..........................
परवाना धारक रिक्षा चालकांसाठी मदत कक्ष सुरू करा
अकाेला : राज्य शासनाने रिक्षा परवाना धारकांना १५००/- रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा परवाना धारकांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय,अकोला मध्ये रिक्षा संघटना, चालक यांना आवश्यक मदत करण्यासाठी तसेच प्रणालीवर प्राप्त अर्जाची छाननी करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करण्यात यावा अशी मागणी युवासेनेच्या वतिने करण्यात आली
युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील युवासेना महानगर प्रमुख नितीन मिश्रा युवासेना जिल्हासचिव अभिजित मुळे व रवी घ्यारे यांनी शुक्रवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांची भेट घेऊन ही मागणी केली. अकोला जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अभिलेखावर परवाना धारक ऑटो रिक्षांची संख्या एकूण १३६२५ आहे मात्र विधिग्राह्य परवान्याची संख्या ५९४० इतकीच आहे. आणि नूतनीकरणास पात्र असलेल्या परवाना धारकांची संख्या ४७१३ आहे हे परवाना धारक नूतनीकरन करून याचा लाभ घेऊ शकतात. या सर्व परवाना धारक रिक्षा चालकांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.
फाेटाे