अकोला : भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून, भाजपाचेच काही आमदार खुलेआम विकृतीला प्रोत्साहन देत आहेत. राम कदम हे त्यांचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. १७ महिन्यात ३ हजार ३०० महिला बेपत्ता आहेत. दिवसाला १२ बलात्कार होतात, राज्यात ३० ते ३५ महिलांचे दररोज शोषण होत आहे. लोकप्रतिनिधी बेताल झाले आहेत. विकृती वाढत असून, त्याला सरकारच खतपाणी घालत आहे, अशा शब्दात राष्टÑवादी काँग्रेसच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चित्रा वाघ यांनी विदर्भ दौरा सुरू केला. त्या अंतर्गत गुरुवारी त्यांनी अकोल्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत बुथ कमिटीचा आढावा घेतला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. चित्रा वाघ यांनी राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची जंत्रीच दिली. एकीकडे महिलांवर आत्याचार वाढत असताना दुसरीकडे भाजपाचे सरकार मात्र कुठल्याही उपाययोजना करण्यासाठी तत्पर नसल्याचा आरोप त्यांनी केला. कायदे आहेत मात्र त्याची अंमलबजावणी प्रभावी होत नाही. बीड, मुंबईमध्ये भाजपा आमदारांच्या मतदारसंघात घडलेल्या तक्रारीसुद्धा पोलिसांनी घेतल्या नाही. त्यासाठी कोर्टात धाव घेऊन गुन्हे दाखल करण्याचा आदेश आणावा लागला. पोलीस यंत्रणाही या सरकारच्या दबावात असल्याने त्यांच्यामधील संवेदनशीलता कमी झाल्याचाही आरोप वाघ यांनी केला.महिला अत्याचाराच्या विरोधात जागर करतानाच आता या सरकारला आम्ही धडा शिकविणार, असा संकल्प महिला करीत आहेत. राष्ट्रवादी महिला आघाडी त्यासाठी आक्रमक होणार असून, येणाºया निवडणुकीत महिला आघाडीची भूमिका ही प्रभावी राहील, असे त्या म्हणाल्या. यावेळी माजी मंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, महानगर अध्यक्ष राजू मुलचंदाणी, श्रीकांत पिसे पाटील, आशा मिरगे, रिजवाना शे.अजिज, पदमा अहेरकर, मंदाताई देशमुख, दिलीप आसरे, रमेश हिंगणकर आदी उपस्थित होते.बॉक्स...गृहमंत्री संरक्षण करण्यास असक्षमराज्याला मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असून, त्यांना दोन राज्यमंत्री आहेत मात्र हे दोन्ही राज्यमंत्री कधीही पीडित महिलांना धीर देताना दिसले नाहीत. महिलांना कायद्याचे संरक्षण देऊन त्यांना धीर देण्याचे काम यांनी कधीच केले नाही. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात उपयायोजना करण्यास हे कुचकामी ठरल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली.