............................................
जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नत्या प्रलंबितच!
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे पदोन्नतीची प्रक्रिया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग केव्हा पूर्ण होणार, यासंदर्भात पदोन्नतीस पात्र जिल्ह्यातील शिक्षकांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
...............................................................
जिल्हा वार्षिक योजनेचे १६५ कोटी खर्च !
अकोला : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील विविध योजना आणि विकासकामांसाठी मंजूर १६५ कोटी रुपयांचा निधी मार्चअखेरपर्यत खर्च करण्यात आला आहे. असे जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री यांनी शनिवारी सांगितले.
............................................
कोरोना उपाययोजनांसाठी निधीची प्रतीक्षा
अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत महिनाभरापूर्वी निधीचा ामागणी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, निधी अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे शासनाकडून निधी केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.
...................................................
‘प्रलंबित प्रकरणे निकाली काढा’
अकोला : जिल्ह्यातील महसूल विभागांतर्गत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना शुक्रवारी दिले. यासंदर्भात व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे उपविभागीय नीलेश अपार आदी अधिकारी सहभागी झाले होते.
...........................................................................
कोविड केअर सेंटरमधील सुविधांची पाहणी
अकोला : कोरोनाबाधित रुग्णांसाठी अकोला शहरात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन, तेथील सुविधांची पाहणी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी शनिवारी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी कोविड सेंटरमधील सुविधांची माहिती घेतली.
............................................................
ग्रामीण भागातील कोरोना उपाययोजनांचा आढावा
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या कामांचा आढावा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी शुक्रवारी घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले यांच्याकडून त्यांनी संबंधित विषयांची माहिती घेतली.