हे वाण विद्यापीठाने नव्यानेच विकसित केले आहे. तसेच मिरची उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांना मिरची या पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य यांचे कार्य व त्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध रोगाविषयी माहिती देण्यात आली. संशोधन संचालक विस्तार शिक्षण डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग डॉ. प्रकाश कडू व त्यांचे शास्त्रज्ञ यांनी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर देण्यासाठी कंबर कसली. या प्रशिक्षणामध्ये डॉ. डी. व्ही. माळी, एस. डी. जाधव, डॉ. संदीप हाडोळे यांनी मार्गदर्शन केले. आयोजनाबाबत सहयोगी प्रा. डॉक्टर संदीप हाडोळे व सहायक प्रा. प्रशांत सरप, सूरज लाखे, श्रेयस नांदुरकर आणि अमोल पाटील हे सर्व विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. तसेच नियोजनाकरिता मैत्री फाऊंडेशनचे रामेश्वर फड यांचेसुद्धा फार मोठे सहकार्य लाभले.
फोटो