चिपळूणमधील दरडग्रस्त गाव भाटा, सोंनपात्र, किसरुळे, चेंबरी, कुंबर्णी येथे १५० किराणा किट व ५० ब्लँकेट देऊन गरजू लोकांना मदत दिली.
चिपळूण येथील तहसील कार्यालय येथे झेंडावंदन करून उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीमध्ये सर्व किराणा किट व ब्लँकेट चिपळूण येथील पंचायत समिती मदत संकलन कार्यालयात जमा केली. ही मदत नेण्याकरिता मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या मार्गदर्शनात निंभा येथील ग्रा.पं. सदस्य चेतन देशमुख, तेजस टापरे, उज्वल ठाकरे, सागर नवले, तुषार बांबल, हर्षल जाधव, शशिकांत सोळंके, रवी गोयकर, पवन तळोकार, वैभव वानखडे, मयूर तायडे, शुभम धामणे, अयान शेख, गाडी चालक जकतउल्ला खान इत्यादी युवकांनी परिश्रम घेतले.