अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे.कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस पाच किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले होते. त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्याचा आदेश राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १० जुलै रोजी निर्गमित करण्यात आला. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना गहू व तांदळाचे मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे.शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रत्येकी ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे.- बी.यू. काळेजिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.