कारंजा (वाशिम): राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शालेय पोषय आहार योजनेकरीता यंदाच्या सत्रासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून ६९६ कोटी ३५ लाख ९२ निधी वितरीत करण्यास शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने २४ ऑगस्ट रोजी मान्यता दिली. समाजातील सर्वच बालकांना सकस आहार मिळावा, तसेच कुपोषण दूर होऊन ग्रामीण भागातील मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांच्या शालेय उपस्थितीत वाढ होऊन कुपोषणमुक्ती करण्याच्या उद्देशाने शासनाच्यावतीने शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. या योजनेत आवश्यक बदल करून आहारात विविधता, नाविन्यता आणण्यासाठी व समाजाचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने विशेष दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमध्ये स्नेहभोजन उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील शाळांमध्ये यंदाच्या शालेय पोषण आहारासाठी केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा मिळून एकूण ६९६ कोटी ३५ लाख ९२ हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यास शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने मान्यता दिली आहे. हा निर्णय वित्त विभागाच्या १७ एप्रिल २0१५ च्या परिपत्रकास अनुसरुन घेण्यात आला आहे.
शालेय पोषण आहार योजनेसाठी सातशे कोटी रूपयांचा निधी वितरीत
By admin | Published: August 26, 2015 1:04 AM