सरपंच प्रशात इंगळे यांनी महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनानुसार, राज्यामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून, कित्येक नागरिकांचा बळी गेला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट व दुसरीकडे उन्हामुळे होणारे दुष्परिणाम, तसेच निकृष्ट दर्जाचे धान्य सेवन केल्यामुळे मानवी शरीरातील रोग प्रतीकात्मक शक्ती कशी वाढणार, असा संतप्त सवाल सरपंच प्रशांत इंगळे यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, तसेच निकृष्ट धान्याचे वाटप शासनाने बंद करून चांगल्या प्रकारचे धान्य शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध करून वाटप करावे, अशी मागणी रंभापूर गट ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत इंगळे यांनी केली आहे, तसेच सर्व सरपंचांनी मासिक सभेमध्ये निकृष्ट धान्यांविषयी ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना ठरावाची मूळ प्रत पाठविण्याचे आवाहन सरपंच प्रशांत इंगळे यांनी निवेदनातून केले आहे.
स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट मक्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:15 AM