शहरातील मंदिरे, वाॅर्डातील घरे व इतर काही ठिकाणी आमदार हरीश पिंपळे, भाजपा शहराध्यक्ष रितेश सबाजकर, तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, भाजयुमो तालुका अध्यक्ष पप्पू मुळे, भाजयुमो शहराध्यक्ष हर्षल साबळे, बूथ प्रमुख कमलाकर गावंडे, लखन अरोरा, गोळे काका, अमोल पिंपळे, लकी अग्रवाल, रोहित अव्वलवार, संजय गुप्ता, चेतन सदार, संदीप जळमकर, अमित नागवान, चिंटू अग्रवाल, गजानन नाकट, बबलू भेलोंडे, राम जोशी, अमोल प्रजापती, प्रवीण लोकरे, संतोष क्षीरभाते, कुलदीप सदार, राहुल अग्रवाल, जयंत वानखडे, नीलेश वानखडे, सुयोग देशमुख, विशाल गुप्ता, अविनाश यावले, बादशाह, योगेश फुरसुले, गणेश ठाकरे, ज्ञानू महामुने यांच्या उपस्थितीत भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख यांच्या हस्ते दाणा-पाणी भांड्यांचे वितरण करण्यात आले.
-----------------------------------------------
मूर्तिजापूरात पक्ष्यांसाठी पाणपोईचे उद्घाटन
मूर्तिजापूर : येथे रोहिणी जलसंधारण मृदसंधारण संस्थेतर्फे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी नागरिकांना दि. १२ मार्च रोजी मातीच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर म्हणाले की, सजीव प्राण्यांमध्ये मनुष्य खूप हुशार आहे, कारण त्याला बोलता येते, पण सजीव प्राण्यांमध्ये पशुपक्षी यांना बोलता येत नाही. मला थंड पाणी पाहिजे, असे म्हणता येत नाही. मानवाला भावभावना असतात तशा त्या प्राणिमात्रांनाही आहेत. पण ते व्यक्त करू शकत नाहीत. यासाठी प्राणिमात्रांवर दया करणे हीच ईश्वर सेवा आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती प्रा. एल.डी. सरोदे, कवीवर्य समाधान भटकर, नेहरू युवा केंद्राचे संचालक विलास वानखडे, रोहिणी जलसंधारण मृदसंधारण संस्थेचे अध्यक्ष पालनदास घोडेस्वार, संस्थेचे पदाधिकारी समाधान इंगळे, श्याम काकडे विकास जोगळे यांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांना पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीचे भांडे वाटप केले. यावेळी प्रा. एल. डी. सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार समाधान इंगळे यांनी मानले. विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणपोईची व्यवस्था करून उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या गायत्री कांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष संगीत कांबे, पत्रकार संजय उमक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (फोटो)