आरटीई शाळा प्रवेशासाठी ११ दिवसांची मुदत
अकोला: आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. शाळा प्रवेशासाठी पालकांना ११ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठी ४७२७ अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. सोडत काढून विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
विश्वजागृती मिशनच्या अध्यक्षपदी वानखडे
अकोला: विश्वजागृती मिशनचे संस्थापक आचार्य सुधांशु महाराज यांच्या आदेशानुसार विश्वजागृती मिशनच्या अकोला शाखा अध्यक्षपदी पुरुषोत्तम वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणीत संरक्षकपदी आ. गोवर्धन शर्मा, समन्वयक आचार्य शिवदत्त महाराज, विश्वजित सिसोदिया यांचा समावेश करण्यात आला आहे.
रामनगरातून वृद्ध बेपत्ता
अकोला: येथील रामनगरातील म्हाडा कॉलनीतील ७२ वर्षीय रामदास तुकाराम पोहरे १३ एप्रिल रोजी बाहेर फिरण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. परंतु, घरी परतले नाहीत. त्यांचा शोध घेतला असता, ते आढळून आले नाहीत. याप्रकरणी सिव्हील लाईन पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.