ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर, दि. ५ - दिवसेंदिवस होणारा पर्यावरणाचा हा-स टाळण्याकरिता शेलूबाजार ग्रामपंचायतच्यावतीने शाडु मातीच्या गणेश मुर्तीचे वितरण मंगरुळपीर पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या हस्ते ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शेलूबाजार चौकात करण्यात आले.
पर्यावरणातील असमतोलामुळे माणसाला जीवनशैलीत बदल करावाच लागतो. याची प्रचिती आता सण उत्सवांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण करू लागल्या. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तींकडे गणेशभक्तांचा कल वाढावा म्हणुन प्रत्येकांनी हा उपक्रम राबविणे गरजेचे आहे.श्री च्या आगमनामुळे सर्वत्र उत्सवाचे वातावरण असतांना आगळा - वेगळा स्तुत्य उपक्रम शेलूबाजार ग्रामपंचायतीनी गावातील व बाहेर गावातील २१ गणेशभक्तांना मातीचे मुर्तीचे वितरण करुन दरवर्षी मातीच्या मुर्तीची स्थापना करावी असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव,ठाणेदार जायभाये, माजी पं.स.उपसभापती विलास लांभाडे, उपसरपंच दत्तात्रय भेराणे, सामाजीक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अनंत गिरी, हिदायत शहा, जलील खान, अशोक हांडे, संतोष लांभाडे,तानाजी बोबडे, गणेश गायके, गोपाल परसे, आदी उपस्थीत होते, या प्रसंगी उपविभागीय अधिकारी यादव ठाणेदार जायभाये यांनी आपले विचार व्यक्त केले प्रास्तावीक पांडुरंग कोठाळे यांनी केले.
या स्तुत्य उपक्रमास मारवाडी युवा मंचाने विशेष प्रोत्साहन दिल्याबद्दल अध्यक्ष मनोज अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आले, यावेळी राजेश भांगडिया, पवन झंवर, सुनिल गोठी, मनोज शर्मा, अजय अग्रवाल,पवन राठी यांच्या सह जयकुमार गुप्ता, सुरज हांडे, युवराज येवले,सतिष भोसले, बंन्टी नाकाडे यांची उपस्थीती होती .