अकोला : शहरातील अनाथ, दिव्यांग असलेल्या दोनशेच्यावर विद्यार्थ्यांना ब्लँकेट, स्वेटरचे रविवारी तुकाराम हॉस्पिटल येथे आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले.स्व. अमित सावल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजीत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत तुकाराम हॉस्पिटलचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून मदनलाल खंडेलवाल, किरण अग्रवाल, डॉ. के. ओ. शर्मा, मधुसुदन बगडिया, आशुतोष गावंडे, नगरसेवक मंगेश काळे, पंकज जायले, ओमप्रकाश सावल, भूपेश मुंदडा, यश सावल, लक्ष्य मुंदडा, केदार खरे, दामोदर मुंदडा यांच्यासह सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर पांडे यांनी केले. मोठी उमरी परिसरातील आनंद आश्रम, गायत्री बालिकाश्रम, उत्कर्ष शिशुगृह, मुकबधिर मुले व मुलींची शाळा, कन्नुभाई व्होरा अंध विद्यालय, सूर्योदय बालगृह या संस्थांचे विद्यार्थी व विविध संस्थांमधील २८० विद्यार्थ्यांना ब्लँकेट, स्वेटर आणि वुलनची टोपी वाटप करण्यात आली. हिवाळा सुरू झाला असून, या अनाथ मुलांना मायेची ऊब म्हणून त्यापूर्वीच ब्लँकेट आणि स्वेटर वाटप करण्यात आले. त्यानंतर या मुलांना भोजनही देण्यात आले. दरम्यान स्व. अमित सावल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनाथ, दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य वाटप करण्यासाठी असे उपक्रम नेहमीच सुरू ठेवणार असल्याचे ओमप्रकाश सावल यांनी सांगितले. तर अनाथ, दिव्यांग विद्यार्थ्यांना गरज भासल्यास संत तुकाराम हॉस्पिटलतर्फे रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कार्यक्रमात पंकज जायले यांनी घोषित केले.फोटो- 02 सीटीसीएल 03-04