मूर्तिजापूर: भाजप शहर युवा मोर्चातर्फे शहरातील विविध ठिकाणी व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या वृद्धांना तसेच गरजूंना उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्रींचे वाटप करण्यात आले.
भाजयुमो जिल्हाध्यक्ष नगरसेवक सचिन देशमुख यांच्या निर्देशाप्रमाणे भाजप जिल्हा अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात मोनाली कमलाकर गावंडे यांच्या नेतृत्वात शहरातील विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला विविध व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या वृद्धांना उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्रींचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाचे हर्षल साबळेतर्फे वितरण करण्यात आले. यावेळी भाजयुमो अकोला जिल्हा सरचिटणीस प्रवीण डिक्कर, भाजप शहराध्यक्ष रितेश सबाजकर, भाजयुमो तालुका अध्यक्ष पप्पू मुळे, भाजयुमो अकोट तालुका अध्यक्ष गोपाल मोहोड, कमलाकर गावंडे, अमोल पिंपळे, अविनाश यावले, रोहित अव्वलवार, अमित नागवान, राहुल गुल्हाने, खुशाल ठोकळ, स्वराज देशमुख, विलास सावळे, ज्ञानू महामुने, गणेश ठाकरे आदी उपस्थित होते. (फोटो)