.............................................
‘सीईओ’ आज घेणार ‘बीईओं’ची बैठक
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया मे महिन्यात राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील बदलीस पात्र शिक्षकांची यादी व इतर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी (सीईओ) सौरभ कटियार सोमवारी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची (बीईओ) बैठक घेणार आहेत.
.................................................................................
कोरोना उपाययोजनांचा आढावा
अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी घेतला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
...........................................................
कोविड चाचणीची पाहणी
अकोला : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी गुरुवारी अकोला शहरानजीक असलेल्या चांदूर येथे भेट देऊन, कोविड चाचणीच्या कामाची पाहणी केली. तसेच लसीकरणाच्या कामाची माहितीदेखील त्यांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.
.............................................................
पाणीटंचाई निवारणाची कामे ठप्पच
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी, कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांची बहुतांश कामे अद्याप ठप्पच आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रतीक्षा केली जात आहे.