बालकवर्गात इम्युनिटी वाढली पाहिजे, ते स्वस्थ व सुदृढ राहिले पाहिजेत, या कोरोना संकटात त्यांना योग्य आहार मिळाला पाहिजे. यासाठी आरोग्य दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. क्लबच्या वतीने यावेळी सूर्योदयच्या बालकांना हेल्दी फ़ूड व दैनिक जीवनोपयोगी साहित्य वितरित करण्यात आले. यामध्ये बालकांना आवळा मुरब्बा, शरबत, डर्मिकुल पाउडर, हेयर ऑइल, सुनफ्लावर ऑइल, नापकिन्स सॅनिटायझर व शंभर मास्क प्रदान करण्यात आलेत. यावेळी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट नीना चीमा यांनी क्लब उपक्रमांची माहिती दिली. आभार क्लब सीसी भारती शेंडे यांनी मानले, या प्रकल्पमध्ये क्लब सेक्रेटरी जयश्री ताकवाले, कोषाध्यक्ष संगीता गांगुर्डे, नीता गांधी, साहनी, अल्का मेहता, नीलिमा ठाकरे आदींनी योगदान दिले. कार्यक्रमात क्लब सदस्या, बालगृहचे कर्मचारी व बालक उपस्थित होते.
फाेटाे आहे