वाडेगाव येथून जवळच असलेल्या तामशी येथील प्रगतिशील शेतकरी गणेश काळे यांनी आपल्या शेतात पेरणी करण्यात आलेल्या उन्हाळी तीळ, सोयाबीन, खरबुज, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका व वर्मी कंपोस्टची पाहणी जिल्हा कृषी अधिकारी यांनी केली आहे. अधिकाधिक पीक उत्पादन घेण्याच्या संदर्भात सविस्तरपणे मार्गदर्शन केले. तसेच सोयाबीन बियाण्याची उगवण चाचणी बाबतीतसुद्धा सखोलपणे मार्गदर्शन करून गणेश काळे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विविध तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन पिके घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. इतर शेतकरी बांधवांनीसुद्धा नवनवीन पिके घेण्याचा प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पाहणीदरम्यान तालुका कृषी अधिकारी माने, मंडळ कृषी अधिकारी काळे, कृषी सहायक धुमाळे व कृषी विभागाचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
फोटो: मेल फोटोत