अकोला : शासनाचे सन २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्हानिहाय सर्वच शासकीय विभागांना वृक्ष लागवडीचे निश्चित टार्गेट देऊन त्यांना वृक्ष लागवडीच्या क्षेत्रासाठी लॅन्ड बँक तयार करावी लागणार आहे.हिरवेगार आणि निसर्गसंपन्नतेसोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने वनराईचे ३३ टक्के क्षेत्र वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील किती क्षेत्रफळावर वृक्ष लागवड करता येईल, याचा अंदाज घेण्यासाठी जिल्हानिहाय लॅन्ड बँक तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, कृषी विभाग, गाव विकास विभाग, नगरविकास विभाग, उद्योग विभाग, जलसंपदा विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, वाहतूक विभाग, आदींना जिल्हानिहाय नोंदणीचे उद्दिष्ट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वृक्ष लागवडीसाठी आता जिल्हानिहाय लँड बँक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 5:26 AM