अकोला- नववर्षाच्या पूर्वसंध्येला अकोला जिल्हाधिकारी यांनी पत्रकार व संपादकांना निवासस्थानी बोलावून अपमानजनक वागणूक दिली होती. या प्रकरणानंतर अकोल्यातील सर्व पत्रकार संघटनांनी जिल्हाधिकाºयांचा निषेध केला होता, त्याची दखल राज्य शासनाने घेतली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. या निर्देशानुसार विभागीय आयुक्त गुरुवारी अकोल्यात संबंधित पत्रकारांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.अकोला जिल्हाधिकारी यांनी संपादक व पत्रकारांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे पडसाद जिल्हाभर उमटले होते. ही घटना घडल्यावर जिल्हाधिकाºयांनी प्रत्येक वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाऊन माफीही मागितली होती; मात्र जिल्हाधिकाºयांनी जाणीवपूर्वक केलेल्या कृत्याबद्दल पत्रकारांनी संतप्त भावना व्यक्त करून निषेध सभा घेतली. त्याची दखल राज्य शासनाने घेतली असून, या प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. ती चौकशी सुरू झाली आहे.