अकोला : केंद्र सरकारने भांडवलदारांच्या हितासाठी देशभरातील कास्तकार व कामगारांच्या प्रचलित कायद्यांना पायदळी तुडवून त्या जागी नवीन कृषी कायदे अमलात आणले आहेत.यातील तीन नियम हे कास्तकारांना कायमचे संपविण्यासाठी पुरेसे असून या काळया कृषी बिलाला कास्तकार व कामगारांनी विरोध करून हे बिल हाणून पाडण्याचे आवाहन काँगेस नेत्यांनी केले.माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त काँग्रेस देशभर किसान अधिकार दिन साजरा करीत आहे. या पर्वात कोट्यवधी कास्तकारांच्या निषेध सहयांचे निवेदन राष्ट्रपती यांना देण्यात येत आहेत.या पर्वावर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथून जवळच असलेल्या गांधी ग्राम येथील गांधी विद्यालयात किसान अधिकार दिन साजरा करण्यात आला.काँग्रेसचे अकोला पूर्व निरीक्षक अविनाश देशमुख तथा इंटक नेते प्रदिप वखारिया यांनी साकार केलेल्या व जिल्हा काँग्रस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात स्वाक्षरी समिती अध्यक्ष अशोकराव अमानकर,काँग्रेस नेते डॉ. सुभाषचंद्र कोरपे,विवेक पारसकर, संजय बोडखे, अकोट तालुका अध्यक्ष प्रशांत पाचडे,जिल्हा उपाध्यक्ष हेमंत देशमुख, डॉ.पुरुषोत्तम दातकर,जिल्हा महासचिव आरिफभाई,युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढोके, जि.प.सदस्य गजानन डाके,माजी जि.प.सदस्य आलमगिर खान,यु. काँ.प्रदेश सचिव सागर कावरे,मनीष भांबुरकर,राजू नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.सोहळ्याचा प्रारंभ महात्मा गांधी यांच्या पुतळा हारार्पण व सरदार पटेल प्रतिमा पूजनाने करण्यात आला.या वेळी या अभिनव आंदोलनाची माहिती उपस्थित कास्तकार व कामगार वर्गाला देण्यात आली. राज्यभरात काँग्रेसच्या वतीने जागोजागी शेतकरी व कामगार बचाव आंदोलन सुरू केलेआहे.या अनुषंगाने कास्तकार व कामगार वर्गाला केंद्र सरकारच्या जाचक त्रासातून मुक्तता मिळावी,शेतकरी व कामगार वर्गाचे काळे कायदे रद्द व्हावेत यासाठी हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला असून जिल्हाभरात पक्षाच्या विविध आघाड्यांच्या वतीने नागरिक स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे.यात कास्तकार व मजूर वर्गाने सहभागी होऊन या काळया कृषी बिलाचा निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी डॉ. कोरपे,मनीष भांबुरकर, अमानकर, ढोके,हेमंत देशमुख,अविनाश देशमुख, वाखारिया आदींनी मार्गदर्शन करीत कृषी बिल हाणून पाडण्याचे आवाहन केले.संचालन हारून शहा यांनी तर आभार सागर कावरे यांनी मानले.राष्ट्रगीताने या सत्याग्रह आंदोलनाचे समापन करण्यात आले. सामाजिक अंतर राखीत संपन्न या किसान अधिकार दिन सत्याग्रहात यावेळी विलास गोतमारे,गणेश कळसकर,राजीव इटोले,अलख राहणे,अनुराग वानरे मोहसिन बेग, राजेश भालतीलक,सुनील वासनकर,मुकुंद सनगाळे,संतोष देशमुख,गणेश ठाकूर,गांधी विद्यालयाचे संचालक रामचंद्र इंगळे, विठ्ठलराव चोपडे समवेत पंचक्रोशीतील कास्तकार,कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
गांधीग्राम येथे जिल्हा काँग्रेसचा किसान अधिकार दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 6:24 PM