लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचा अकोला जिल्हा प्रेरणा मेळावा झाला. अंनिसचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र अंनिसचे राज्य महासचिव मिलिंद देशमुख पुणे व विदर्भ कार्यवाह गजेंद्र सुरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे प्रास्ताविक अकोला जिल्हा महासचिव बबनराव कानकिरड यांनी केले. गजेंद्र सुरकार यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यपद्धतीवर व संघटनात्मक बांधणी याबाबत मार्गदर्शन केले, तर मिलिंद देशमुख यांनी विवेकीकरणानेच समाजात परिवर्तन घडविता येत असल्याने विवेकी कार्यकर्ते अंनिसमधून निर्माण होत असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी मानद वन्यजीव संरक्षक म्हणून शासनाने बाळ काळणे यांची नियुक्ती केल्याबद्दल महादेवराव भुईभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय तिडके यांनी तर आभार प्रसिद्धिप्रमुख गजानन ढाले यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. प्रवीण वाघमारे, श्रीकृष्ण माळी, प्रशांत नागे, बी. एस. इंगळे, विजय वाखारकर, गोविंद राणे, रोहन बुंदेले, डॉ. एकनाथ खेडकर, पंजाब वर, प्रशांत गावंडे, आशा बारस्कर, विद्या राणे, अजाबराव टाले, जयशन गुडधे, जीवन दारोकर यांच्यासह जिल्हाभरातील अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र अंनिसचा जिल्हास्तरीय प्रेरणा मेळावा
By admin | Published: July 17, 2017 3:15 AM